‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय चोरमारे यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय चोरमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शुक्रवार, दि. 6 मे 2022 रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती कार्यरत आहे. राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचे योगदान याविषयी सविस्तर माहिती डॉ.विजय चोरमारे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.