आठवडा विशेष टीम―
नागपूर, दिनांक 4 : गडकिल्ल्याची प्रतिकृती असलेल्या दालनातील ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हे राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे चित्रमय प्रदर्शन जनतेचे आकर्षण ठरत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सीताबर्डी मेट्रो स्टेशनमध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा गुरुवार, 5 मे रोजी शेवटचा दिवस आहे.
राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या पाच दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनास नागपूरकर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या प्रदर्शनाचा समारोप 5 मे रोजी सायंकाळी होणार आहे. प्रदर्शन सकाळी दहा वाजेपासून सर्वांना निःशुल्क पाहता येईल.
गडकिल्ल्याची प्रतिकृती असलेल्या या प्रदर्शनाला भेट देताना आपण एका किल्ल्यात जात असल्याचा आभास होतो. या प्रदर्शनात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात दोन वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली आहे. कोरोना काळातही राज्य शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या कामगिरीविषयीची माहिती या प्रदर्शनात राज्यस्तरीय 53 पॅनल्स तर नागपूर विभागातील सहा पॅनल्स तसेच नागपूर मेट्रोच्या दोन पॅनल्सवर आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनास भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी केले आहे.
000