आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 05 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस विभाग, क्रीडा व महसूल विभागातील उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते.
नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरिक्षक अतुल सबनीस, जयेश भांडारकर, गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमप्रकाश सोनटक्के, पोलीस उपनिरिक्षक रतन उंबरकर, मोहन शाहु, श्रीनीवास मिश्रा, कृष्णकुमार तिवारी, पोलीस हवालदार रघुनाथ धुर्वे, दत्तात्रय निनावे, मृदुल नगरे, मनिष टोंगे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे तीन मानकरी या प्रमाणे आहेत. सॉफ्टबॉलमध्ये डॉ. चेतन महाडिक, ॲथलेटिक्समध्ये कु. निलिमा राऊत तर बॉक्सिंगमध्ये कु. अल्फिया तरन्न्म अक्रमखान पठाण यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख 10 हजाराचे बक्षिस देण्यात आले.
जिल्हा युवा पुरस्काराचे तीन मानकरी ठरले असून सामाजिक कार्यासाठी मोनीष अठ्ठरकर, युक्ती बेहनिया यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 10 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले तर नयन बहुउद्देशिय महिला विकास व तांत्रिक शिक्षण संस्था नागपूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 50 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले.
महसूल विभागातील राजु लोणकर यांना आदर्श तलाठी पुरस्कारबद्दल प्रमाणपत्र व 5 हजार रोख बक्षिस देण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
नागपूर, दि. 05 : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कस्तुरचंद पार्क येथील मुख्य कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिकाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वर्षी देशभरात स्वातत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य कोरोनातून निर्बंध मूक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली. अनुसूचित जाती नवबौध्द घटकासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहीक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश आहे.
000000