राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे अभिवादन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 6 :- सामाजिक क्रांतीचे प्रणेतेआरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी  छत्रपती  शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज मंत्रालयात पर्यावरणपाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून राजर्षी शाहू महाराज  यांना आदरांजली वाहण्यात आली.

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

आमदार डॉ. देवराव होळीआमदार शाह फारुख अन्वरआमदार किसन कथोरे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक गायकवाडअनु.जाती/जमाती/विजा-भज/इ.मा.व/वि.मा.प्र शासकीय निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनचे राज्य महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळेसंघटनेचे राज्यध्यक्ष भारत वानखेडेयांनीही राजर्षी  छत्रपती  शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन वंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.