आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 6 : – केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ तसेच वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२२ पर्यंत मागविण्यात येत आहेत. उमेदवारांसाठी http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती व अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त यांनी दिली आहे.
०००