पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दिनांक 9 मे, 2022(आठवडा विशेष वृत्तसेवा): राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अन्न व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी हायजीन रेट्रिंग व इट राईट कॅम्पस ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील 6 कॅम्पसला इट राईट कॅम्पस आणि 9 आस्थापनांना हायजीन रेटींग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्लीच्या ईट राईट कार्यक्रमांतर्गत हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगर पालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे आदी उपस्थित होते.

इट राईट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आस्थापनांची व कामगारांची वैयक्तिक स्वच्छता पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता, कामगारांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी व अन्न पदार्थांची गुणवत्ता इत्यादींना प्राध्यान्य देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील रेस्टॉरंस्ट, कॅफेटेरिया, ढाबा, बेकरी, मिठाई दुकाने किरकोळ विक्री करणारे चिकण व मटन आस्थापनांना तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठे आस्थापना व रूग्णलयाच्या कॅम्पस मधून सुरक्षित व आरोग्यदाई अन्न पादार्थास चालना देणाऱ्यांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत.

यांना झाले इट राईट कॅम्पस प्रमाणपत्राचे वाटप

 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठ
 • एस.एम.बी.टी. मेडिकल सायन्सकॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर
 • महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कॅम्पस
 • दिलासा प्रतिष्ठान
 • सपकाळ नॉलेज हब प्रशासकीय अधिकारी व प्राचार्य
 • इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायवेट लिमिटेड

यांना झाले हाजीन रेटिंग प्रमाणपत्राचे वाटप

 • कॉलेज रोड, गंगापूर रोड, गोविंद नगर येथील सागर स्वीट्स
 • मधुर फुड्स प्लाझा
 • तुषार फुड्स हब
 • हॉटेल तुषार
 • आराधना स्वीट्स
 • लॉर्डस फुड्स प्रॉडक्स्
 • सत्यम स्वीट्स
 • सिमला फुड्स
 • गणेश स्वीट्स

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.