परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

विक्रमी वसुली करणार्‍या परळी महावितरण विभागात साहित्याचा तुटवडा ; बॉक्स उघडे,ना फ्यूज ना तारा

साहित्य नसल्याने अनेक ट्रान्सफार्मर बॉक्स उघडे, ना फ्युज, ना तारा नागरिकांच्या जीवतास धोका

साहित्य तात्काळ उपब्ध करुन द्यावे-वसंत मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महावितरणच्या परळी उपविभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रचंड मेहनत घेत विक्रमी वसुली केली. परंतु महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडुन या विभागात ट्रानसफार्मर साठी आवश्यक असणार्‍या साहित्याचा पुरवठा होत नसल्याने बहुतांश ठिकाणचे ट्रान्सफार्मर बॉक्स उघडे असुन यातील फ्युजला ताराही उपलब्ध नाहीत. हे उघडे बॉक्स नागरिकांसह जनावरांसाठी धोकादायक बनत असुन वसुली मध्ये सहकार्य करणार्‍या ग्राहकांमधुन प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. साहित्य तात्काळ उपब्ध करुन द्यावे अशी मागणी श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणच्या परळी उपविभायी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी प्रचंड मेहनत घेत. मार्च महिन्यात सव्वा तीन कोटीची वसुली केली. महावितरणच्या अधिकार्‍यांना परळी विभागातील ग्राहकांनी प्रतिसाद दिला यामुळेच ही वसुली झाली. परंतु या बद्दल्यात महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयांकडुन परळी उपविभागाला फ्युज, फ्युज तार, डी.ओ.तार, ट्रान्सफार्म बॉक्स दरवाजे आदी साहित्याचा पुरवठाच झालेला नसल्याने परळीच्या महावितरण कार्यालयात हे साहित्य उपलब्ध नाही. यामुळे ग्राहकांचा रोष परळी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना सहन करावा लागत आहे. परळी शहरासह तालुक्यातील बहुतांश ट्रान्सफर्मरचे बॉक्स उघडेच असल्याने हे बॉक्स नागरिक व जनावरांच्या जिवितास धोकादायक बनत आहेत. तसेच या उघड्या बॉक्समुळे पावसाच्या दोन सरीतही वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत परळी उपविभागीय कार्यालयात अधिकारी उदासिन असल्याने याचा सर्वात जास्त त्रास नागरिकांना होत आहे.

साहित्य तात्काळ उपब्ध करुन द्यावे-वसंत मुंडे

परळी महावितरण कार्यालयात सद्या सर्वच प्रकारचे आवश्यक असणार्‍या साहित्याचा तुटवटा आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकार्‍यांनी पाठपुरावा करुन वरिष्ठ कार्यालयांकडुन हे साहित्य उपलब्ध करुन द्यावे. परळीतील ग्राहक हा वसुलीसाठी सहकार्य करीत असतात. त्याच प्रमाणात महावितरण कडुन सुविधा उपलब्ध करुन देणे क्रम प्राप्त आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी हे साहित्य उपलब्ध करुन आवश्यक त्या ठिकाणी उपाय योजना नाही केल्या तर याची शासन दरबारी तक्रार करण्यात येईल. कारण याचा त्रास सहन करण्याबरोबरच वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. याचे प्रमाण ग्रामिण भागात जास्त असल्याने ग्रामिण भागातील जनतेचा विचार करुन तरी हे साहित्य उपलब्ध करावे अशी मागणी श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.