गोट बँकेची संकल्पना राबवून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. १० : नागपूर जिल्ह्यातील ५०० महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेचे संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होतेयावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ताआयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ शशांक कांबळे यांच्यासह प्रक्षेत्र व्यवस्थापक  उपस्थित होते.

मंत्री श्री. केदार म्हणालेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन शासन आल्यानंतर महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये झाले आहे. तसेच महामंडळाची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल ४० कोटी रुपयांची पर्यंत पोहचली आहे. पूर्वी राज्यात १०प्रक्षेत्र होतेते आता १६ झाले आहेत. मांडग्याळ या मेंढीच्या जातीस केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहे.  मांडग्याळ ही मेंढीची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध जात म्हणून ओळखली जात आहे. असे त्यांनी सांगितले.

इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत. लोकरीचे विविध प्रकारचे उत्पादने निर्माण करुन विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

शेळी मेंढी विमा विषयी माहिती पशुपालकापर्यंत पोहचवा

शेवटच्या पशुपालकांपर्यंत शेळी मेंढी विमा योजनेविषयी माहिती पोहचविण्यासाठी सर्व प्रक्षेत्र व्यवस्थापकांसह विभागाने प्राधान्य द्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी प्रक्षेत्र व्यवस्थापकांनी आप आपल्या प्रक्षेत्राची माहिती सांगून अधिक विकसित करण्यासाठी विविध सुचना केल्या.महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कांबळे यांनी यावेळी महामंडळाची सविस्तर माहिती दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ९४ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये पशूधन खरेदी करणेनवीन वाडे बांधकामकृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणेमुरघास निर्मिती यंत्रसामुग्रीशेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामप्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवासस्थानजमीन विकाससिंचन सुविधा विहीरपाईपलाईनइलेक्ट्रिक मोटर इत्यादी. ट्रॅक्टर ट्रॉलीकृषी अवजारे व चारा कापणी यंत्रवैरण साठवणूक गोडाऊनशेळी-मेंढी खाद्य कारखानाकार्यालय इमारत बांधकामअधिकारी कर्मचारी निवास बांधकामप्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामुग्रीसुरक्षा भिंतसिल्वी -पाश्चर विकसित करणेअंतर्गत रस्तेअल्ट्रासोनोग्राफी युनिटफिरते शेळी-मेंढी चिकित्सालय वाहन खरेदीफाँडर ब्लॉक मेकिंग युनिट ,सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.