जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 11 : पालघरधुळेनंदुरबारवाशीमनागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदानतर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईलअशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखाडाजि. पालघर)हिसाळे (शिरपूरजि. धुळे)हट्टी खु. (साक्रीजि. धुळे)असली (अक्राणीजि. नंदुरबार)ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगावजि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेरजि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वा. सुरू होईल.

-0-0-0–

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.