शिवसेना आमदार रमेश लटके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 12 :- “मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. शिवसेना कार्यकर्त्यापासून मुंबई महापालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास ध्येयनिष्ठ, पक्षनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ लोकसेवकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. संमिश्र लोकवस्तीच्या अंधेरी-पूर्व मतदारसंघातून सलग मिळवलेला विजय त्यांची लोकप्रियता, जनतेशी जूळलेली घट्ट नाळ दाखवणारा आहे.

आमदार रमेश लटके यांचं निधन ही त्यांच्या मतदारसंघाची, महाविकास आघाडीची हानी आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.