कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यू कल्चर लॅबची पाहणी     

आठवडा विशेष टीम―

पुणे दि. १६: कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली.

मांजरी  केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या पाहणी दौऱ्यावेळी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषकुमार जैन,संचालक किशोर राजहंस, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी उपस्थित होते.

श्री.भुसे यांनी टिश्यूकल्चर लॅब, उत्पादन केंद्र, ग्रीन हाऊस तसेच डमो हाऊसची पाहणी केली. फुले किती दिवस टिकू शकतात, उत्पादन, फुलांचे विविध प्रकार, निर्यातीबाबत नियोजन, हवामान बदलाचा परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन आदींसह विविध विषयाववर चर्चा झाली. केएफ बायोप्लॅन्टसमूहाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पॉलिहाऊसमधील नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा कृषिमंत्री  भुसे यांनी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी या टिश्यू कल्चर लॅब तसेच बायोप्लॅन्टच्या कार्याची माहिती दिली. 30 देशात रोपांची निर्यात होत असून समूहाच्या ४ प्रयोगशाळा आहेत, दोन प्रयोगशाळांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.