कोलंबो(वृत्तसंस्था): श्रीलंका देशाची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला असून, 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात 35 विदेशी पर्यटकांचा मृत्य ची माहिती मिळत आहे.
#BREAKING Sri Lanka imposes 'temporary' social media ban after blasts https://t.co/V1XSwaiXw9 pic.twitter.com/ExLAfb4NlV
— AFP News Agency (@AFP) April 21, 2019
दरम्यान, या साखळी स्फोटांनंतर भारतातसुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.श्रीलंका सरकारने श्रीलंकेत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. कोलंबोतील दोन फाइव्ह स्टार हॉटेलांतही बॉम्बस्फोट झाले.
दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे त्या म्हणाल्या.