अकोट मधील मध्यरात्रीची घटना
अकोट दि.२२: अंजनगाव मार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला अंजनगाव कडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक दीपक अशोक बिजली हा २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला व एक जण गंभीर झाल्याची घटना रविवारी (दि.२१) च्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव मार्गावर ट्रॅक्टर व ट्राॅली उभी होती. अंजनगावकडून येणारया भरधाव दुचाकीने येत असलेल्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गाडीने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की,या अपघातात दुचाकी चालक दीपक बिजली (वय २२)हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असणारया शहर पोलिसांनी जखमीला ग्रामीण रूग्नालयात उपचारासाठी हलवले मात्र गंभीर जखमी असल्यामुळे त्याला अकोला येथे रवाना करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण रूग्नालयाचे डाॅ चक्रणारायान यांचे तर्फे वार्डबाॅय श्रीकांत नृपणारायण यांचे फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.