इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 19 : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल  ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी करिता अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजन करण्यात आले. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 20 मे 2022 व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे 2022 रोजी www.doa.maharashtra.gov.in त्याचप्रमाणे https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत.

या दोन्ही परीक्षा मिळून वर्ष 2021 मध्ये एलिमेंटरीसाठी 1 लाख 2 हजार 818 व इंटरमिजिएटसाठी 1 लाख 11 हजार 170 असे एकूण 2 लाख 13 हजार 988  परीक्षार्थ्यांनी नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल अनुक्रमे 96.15 % व 94.65% इतका लागला आहे, अशी माहिती कला संचालनालयाचे प्र.कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.