शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. 21 : मुंबई विद्यापीठातील सर कावसजी सभागृहात आयोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शनाला आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी यांच्यासमवेत भेट दिली.

ही जुनी छायाचित्रे पाहिल्यानंतर बाळासाहेबांच्या बरोबरचे ते दिवस आणि तो कालखंड आठवला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच्या काही आठवणीही सांगितल्या. बाळासाहेबांना नवे काही तंत्रज्ञान आले की त्याविषयी उत्सुकता असायची आणि माझ्याकडून ते जाणून घ्यायचे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, छायाचित्रण हे गेलेला क्षण पुन्हा जिवंत करून आपल्यासमोर आणते. बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकातदेखील जुनी चांगली छायाचित्रे लावायची आहेत. खूप प्रयत्नानंतर बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे संकलन असलेले फटकारे पुस्तक प्रकाशित करता आले याचे मला खूप समाधान आहे असेही ते म्हणाले. मी आपल्यापैकीच एक असून आपल्या मागण्यांवर निश्चितपणे विचार केला जाईल असेही ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचे श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.