‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या हेमंत वसेकर यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 26 मे २०२२ रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

 

महाराष्ट्राचे नागरिकीकरण खूप वेगात होत असले तरी आजही 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राज्याच्या ग्रामीण भागात राहते. शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांतूनच या लोकसंख्येला प्रामुख्याने रोजगार मिळतो. ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच या लोकसंख्येचे जीवनमान अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्यातून होत असलेल्या बदलांबाबत सविस्तर माहिती डॉ. हेमंत वसेकर यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.