सामान्यांना कवच जन आरोग्य योजनांचे

आठवडा विशेष टीम―

केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या सुरु करण्यात आली आहे. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2 कोटी 22 लाख लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना, 2011 च्या यादीतील (SECC database) राज्यभरातील 83.63 लक्ष कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. ठाणे जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे 2 लाख 7 हजार 276 ई कार्ड वाटप करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 63 रुग्णालये समाविष्ट आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 1 एप्रिल 2020 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 81 हजार 416 वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी प्रिऑथरायझेशन घेतले गेले आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन वर्षात एकूण 4688 प्रिऑथरायझेशन घेतले गेले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गरजू रुग्णांना कोरोना उपचार, म्युकरमायक्रोसीस, कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, किडनी आजार, मेंदुची शस्त्रक्रिया, नेत्रशस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग व प्रसुती याबाबत या योजनेअंतर्गत रुग्णांवर यशस्वीरीत्या मोफत उपचार दिले गेले आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी :

 

गट लाभार्थ्यांचा तपशील
गट अ महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमधील अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍ शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
गट ब अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
गट क •      शासकीय अनाथाश्रमातील मुले

•      शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी

•      शासकीय महिला आश्रमातील महिला

•      शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक

•      माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य.

•     महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

 प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी : सामाजिक, आर्थिक व जा‍तनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार अनुक्रमे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

क्षेत्र लाभार्थ्यांचा तपशील
शहरी शहरी भागातील खालील 11 व्यावसायिक गटातील कामगार योजनेसाठी पात्र आहेत.

•      कचरा वेचक

•      भिक्षुक

•      घरगुती कामगार

•      गटई कामगार/ मोची/फेरीवाले/रस्त्यावर सेवा पुरविणारे अन्य कामगार

•      बांधकाम कामगार/ प्लंबर/ गवंडी/कामगार/ रंगारी/ वेल्डर/सुरक्षा रक्षक/हमाल व डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार

•      सफाईगार/स्वच्छक/ माळी

•      घरकाम करणारे/ हस्तकला कारागीर/शिंपी,

•       वाहतूक कर्मचारी/ चालक/ वाहक/ चालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा ओढणारे

•      दुकानात काम करणारे/ सहाय्यक/ लहान आस्थापनांमधील शिपाई/ मदतनीस/ अटेण्डट/

वेटर

•      वीजतंत्री/ मेकॅनिक/ असेम्ब्ली / दुरुस्ती करणारे

•     धोबी व वॉचमन

ग्रामीण ग्रामीण भागाच्या एकूण 7 वंचित निकषांपैकी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील कुटुंबांचा समावेश होतो.

•  D1-  कच्च्या भिंती व कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब

•  D2-  16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे

•  D3-  16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब

•  D4-   दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे

•  D5-  अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे

•  D7-  भूमिहीन मजूराची कुटुंबे

आपोआप समाविष्ट

•      बेघर

•      भिक्षुक

•      स्वच्छता कर्मी, निराधार कुटुंब

•      मुलत: अनुसूचित जमाती

•       कायदेशीर बंधपत्रित कामगार

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी : सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 मध्ये नोंदीत कुटुंबांतील सदस्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात संगणकीकृत ई-कार्ड व फोटो ओळखपत्र दाखवून लाभ घेऊ शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत एका राज्यातील रुग्ण देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयांत जाऊन शस्त्रक्रिया/उपचारांचा लाभ घेऊ शकतो.

खालील ठिकाणी संस्थेमार्फत आयुष्मान कार्डस उपलब्ध होतात

  • आपले सरकार सेवा केंद्र
  • अंगीकृत रुग्णालये
  • UTIITSL (UTI Infrastructure Technology and Services Limited)
  • Zephyr limited
  • Colorplast systems private limited.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY):

या योजनेंतर्गत एका *पॉलिसी वर्षात लाभार्थ्यावर प्रति कुटुंब ₹1,50,000/- पर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाचा समावेश होतो. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब प्रति *पॉलिसी वर्ष ₹ 2,50,000/- इतकी वाढविण्यात आली आहे.

 आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY):

  • या योजनेंतर्गत व्दितीय व तृतीय सेवेकरिता देशातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति *पॉलिसी वर्ष ₹5 लक्षापर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. या योजनेचा लाभ देखील कुटुंबांतील एका किंवा सर्व सदस्यांना घेता येतो म्हणजेच ₹5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.

उपचारांचा समावेश:

  • योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये  पुढील निवडक 34 विशेष सेवा प्रकारांतर्गत झालेल्या शस्त्रक्रिया व चिकित्सा यावरील नि:शुल्क उपचारांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा समावेश आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1209 शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार (म.ज्यो.फु.ज.आ. योजनेतील 996 उपचार +अतिरिक्त 213 उपचार) समाविष्ट असून यामध्ये  183 (म.ज्यो.फु.ज.आ. योजनेतील 121 सेवा + अतिरिक्त 62 सेवा) शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (follow up packages)अंतर्भाव आहे.
  • 24 x 7 कॉल सेंटर : नंबर 155388, 18002332200 jeevandayee.gov.in

 

– अजय जाधव,

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.