क्राईममहाराष्ट्र राज्य

सोनसाखळी चोरणारे दोन अट्टल गुन्हेगार दरोडा प्रतिबंधक पथकाने केले जेरबंद

विशेष प्रतिनिधी | बीड

आज दि १८/०१/२०१९ रोजी दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि श्री गजानन जाधव सो.,पोह/११३५ मुंजाबा सौंदरमल,पोह/३६९ खताळ, पोह/१११८ नागरगोजे, पोह/७३८ राठोड, पोना/१६२६ शिंदे, पोना/४७३ बांगर, पोना/१६०९ दबाले, पोना/१७५ बंड, पोकॉ/११२६ चव्हाण पोकॉ/१८८७ दुधाळ, व मपोना/१४२० साबळे असे सरकारी वाहन क्र.एमएच-२३-एएफ-००९३ चे चासफो/१०८४ साबळे व खासगी मोटार सायकलने पो.स्टे. बीड शहर गुरनं १२/१९ ,१३/१९, १४/१९ क. ३९२,३४ भादवी मधील आरोपी शोध कामी बीड शहरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्री लायक बातमी मिळाली की एक इसम याने बीड शहरात पांढऱ्या रंगाचे होंडा स्कुटीवर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून घेऊन पळून जातो त्याचे सोबत आणखी एक साथीदार असतो तो सध्या आंबेडकर चौकात पेठबीड भागात फिरत आहे.अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही बातमीचे ठिकाणी वरील नमूद स्टॉप सह शोध घेतला असता एक संशयित इसम आम्हा पोलिसांना पाहून पळून जात असताना त्याचा आम्ही पाठलाग केला त्यावेळी त्याने आरेरावी व आमचे बरोबर हुज्जत घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास आम्ही पाठलाग करून ताब्यात घेतले.त्यास वरील गुन्ह्या संदर्भात विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिले.त्यांनतर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने पोलीस ठाणे बीड शहर हद्दीतील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिणे मी व आणखी दोन साथीदार असे तिघांनी मिळून आळीपाळीने पांढऱ्या रंगाच्या होंडा स्कुटी क्रमांक MH 23 U 7113 चा वापर करून चोऱ्या केल्या आहेत ,असे सांगितले त्यानंतर लागलीच दुसऱ्या साथीदाराचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचे तपासकामी सदर आरोपी ,गुन्ह्यातील गेला माल,गुन्हा करतेवेळी वापरलेली पांढरी होंडा स्कुटी समक्ष पोस्टे बीड शहर येथे हजर करण्यात आले आहे.अशा प्रकारे दरोडा प्रतिबंधक पथकाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दोन अट्टल चोरट्यांना पकडून पोलिसांची मान उंचावलेली आहे.

सध्या चालू असलेल्या मकर संक्रांतीच्या सणासुदीच्या काळात महिलांनी रस्त्यांनी वावरताना आपल्या दागदागिन्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.काही अनुचित चोरीसारखा प्रकार घडल्यास तात्काळ बीड पोलिसांशी संपर्क साधावा.

सदरील कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक जी. श्रीधर ,अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि गजानन जाधव व त्यांचे सोबत मुंजाबा सौंदरमल ,खताळ , नागरगोजे ,पोह/७३८ राठोड , शिंदे , बांगर, दुबाले , बंड , चव्हाण दुधाळ, व माया साबळे , नारायण साबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.