पातूर : पातूर शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या कान्होबा चौक येथे बंडु हरिभाऊ घोलप यांचे घरी बुधवारी दुपारी १२:३० वाजता गैस लीकेजमुळे लागलेल्या आगित तीन जन जखमी झाले असुन एक लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सविस्तर हकिकत अशी की, श्री घोलप यांचे घरामध्ये पाहुणे आले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. मंगला घोलप ह्या गैस सुरु करायला गेल्या असता रेगुलेटरला सुरु केल्यानंतर धुर निघाला. धुर का निघाला हे पाहण्याकरिता श्री घोलप यांचा मुलगा बबलू हा तेथे आला. त्याने सुध्दा रेगुलेटरला काय झाले हे पाहण्याकरिता गेला असता लीकेज गैस मुळे नळीने पेट घेतला. यामध्ये सदर आग विझवण्याचा प्रयत्न करणार्या बंडु घोलप, सौ. मंगला घोलप, बबलू घोलप हे जखमी झाले. या घटनेची माहिती पातूर पोलिस व इंडियन गैसचे संचालक अनिल ठाकरे यांना तात्काळ दिली.
त्यामुळे गैस दुकाणचे कर्मचारी व पोलीस स्टेशनचे जमादार रमेश घोगरे घटनास्थळी दाखल झाले. या घटनास्थळावर पातूर नगर पालिकेचे उपाध्यक्ष राजु उगले, भारतीताई गाडगे, युवा सेनेचे योगेश फुलारी, नंदकिशोर निंबोळे, राहुल अत्तरकार, धीरज कुटे आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. यावेळी पातूर नगर पालिकेच्या अग्नि शमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. गाडीसुध्दा तात्काळ आली. आणि घराला लागलेली आग अग्नि शमन दलाने विझविल्यामुळे मोठी दुर्दैवि घटना टळली. यामध्ये कुठलिही जिवितहानी झाली नाही. या आगीमध्ये दोन मोबाइल सह घरातील स्टिलचे भांडे, लाकुडफाटा, कापडाचे साहित्य, घरातील धान्य जळुन खाक झाले. त्यामुळे जवळपास एक लाखेचे नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.