पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि.2 (जिमाका): निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. यामुळे आपत्ती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीत जीवित  व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि विभाग प्रमुखांनी मान्सून कालावधीत मुख्यालय सोडू नये, असे निर्देश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मान्सून पूर्वतयारी व  आपत्ती व्यवस्थापन आढावा  बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.