आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविलेल्या मुंबई येथील रोहन कदम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 3 मे व शनिवार 4 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी घेत असलेल्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्या काही वर्षांत मराठी टक्का सातत्याने वाढतो आहे. राज्य शासन या परीक्षांमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी विविध पातळ्यांवर काम करत आहे. बार्टी, सारथी सारख्या संस्था मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहेत. राज्य शासनाचा उदार दृष्टीकोन, विद्यार्थ्यांची अपार मेहनत यामुळे लोकसेवा परीक्षेत मराठी मुले आपला झेंडा रोवत आहेत. रोहन कदम यांनी केलेली तयारी आणि त्यातून यशाला घातलेली गवसणी याविषयी सविस्तर माहिती त्यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
प्रवीण कुलकर्णी/उपसंपादक/2.6.22