सोयगाव,ता.२५(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):लोकसभा निवडणुकांच्या नंतर सोयगाव तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय काळे यांचेसह गुरुवारी पदाचे राजीनामे युवकचे जिल्हाध्यक्ष समीर सत्तार यांचेकडे सादर केल्याने शहरात निवडणुकानंतर खळबळ उडाली असून शहरातील युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची समिती बरखास्त करण्यात आल्याचे तालुका युवकचे अध्यक्ष अक्षय काळे यांनी सांगितले.
तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सामुहिक राजीनाम्यात म्हटले आहे कि,काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आर्थिक खेळी करणाऱ्या पुढाऱ्यांना किंमत दिल्या जात असल्याने पक्षाच्या या मनमानी ध्येय व धोरणामुळे तालुका युवक काँग्रेसची तालुका समिती बरखास्त करण्यात येत आहे.राजीनामे दिलेल्या मध्ये हर्शल देशमुख,अमोल मापारी,कुणाल राजपूत,अरुण वाघ,शरीफ शेख,एजाज देशमुख,रतिलाल सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.