ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि 3 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाआवास अभियान ग्रामीण यास 31 मार्च पर्यंत मान्यता देण्यात आली होती. आता हे अभियान राबविण्यासाठी  30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.