आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 6 जून, मंगळवार दि. 7 जून, बुधवार 8 जून व गुरूवार 9 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नुकत्याच स्वित्झर्लंड येथील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने 24 कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. या परिषदेत महाराष्ट्राने 80 हजार कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले असून त्यातून लाखभर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्वांविषयी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
०००