औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद : सोयगाव-जरंडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा,गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव

सोयगाव दि.२६(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगाव-जरंडी रस्त्यावर गतीरोधकाअभावी वाहने भरधाव झाल्याने आठवडाभरात तिघांचे बळी आणि तब्बल पाच जण गंभीर जखमी झाल्याचं घटना घडल्या आहे.दरम्यान या नऊ कि.मी अंतराच्या रस्त्यावर सार्वजनिक विभागाने गतीरोधकच न बसविल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याने वाहनधारकांना नको तो रस्ता अशी अवस्था झाली आहे.
सार्वजनिक विभागाकडून सोयगाव ते जरंडी या नऊ कि.मी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डागडुजीचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याच्या दरम्यान तब्बल नऊ कि.मी अंतरावर गतिरोधक नसल्याने या रस्त्यावरील वाहतूक भरधाव झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.यापूर्वीच्या जुनी रस्त्यावर असलेल्या ठिकाणाचे गतिरोधक सार्वजनिक विभागाने काढून टाकले असल्याने रस्त्यावर वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.आठवदाभराच्या काळात या रस्त्यावर तिघांचे नाहक बळी गेले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे.गतिरोधक नसल्याने रस्त्यावर भरधाव वाहतुकीअभावी धोके वाढले असून सार्वजनिक विभागाने यापूर्वीचे गतिरोधक काढल्याने रस्ता सुसाट झाला आहे.त्यामुळे रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डागडुजीचे काम अद्यापही सुरु असल्याने संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यावर गतिरोधक तातडीने बसवावे अशी मागणी जोर धरत आहे व तिखी फाटा ते घोसला रस्त्यावर जे नदीपुलावर जे डाबरी करण सोडून दिले ते पण अपघाती ठरत आहे उबरविहरे या पुलावर मोठा जीवघेणा खडा पडला आहे त्या कडे सां. बा विभाग या गोष्टी कडे डोळे झाक करत यास जबाबदार विभाग अधिकारी निष्काळजीपणा करत आहे येथे छोटे मोठे अपघात झाले आहेत .

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.