आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषिमंत्री दादाजी भुसे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ‘मोबाईल ॲप’वर शुक्रवार दि. 10 जून, शनिवार दि. 11 जून व सोमवार 13 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्य शासन कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. आपला शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा, त्यातून राज्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासन आग्रही आहे. केवळ पावसावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. खरीप हंगामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन यावे यासाठी कृषि विभागाने अतिशय काटेकोर नियोजन केले आहे. याच नियोजनाविषयी आणि एकूणच कृषी विभागाच्या विविध योजना आणि त्यातून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांविषयी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
००००
प्रवीण कुलकर्णी/उपसंपादक/8.6.22