खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके

आठवडा विशेष टीम―

पंचकुला, दि. 8 : खेलो इंडिया स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या संघाने २ सुवर्ण, ३ रौप्य व ५ कांस्य पदके पटकावली. कुस्ती, अॅथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमधील पदकांचा यात समावेश आहे.

ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ आहे.

आज जलतरण – बटरफ्लाय – आर्यन वर्णेकर (कांस्यपदक, लिंब, सातारा), ८०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (रौप्य, मुंबई). अॅथलेटिक्स – १०० मीटर हर्डल्स – प्रांजली पाटील (कांस्य, मुंबई), ट्रिपल जंप – पूर्वा सावंत -सुवर्णपदक.

मल्लखांब – रौप्य (एक सांघिक उपविजेतेपद). प्रणाली मोरे (सातारा), भक्ती मोरे (सातारा), पलक चुरी (मुंबई), हार्दिका शिंदे (मुंबई), आरूषी शिंघवी (अमरावती), तमन्ना संघवी (मुंबई) या मुलींचा मल्लखांबचा संघ आहे. त्यांनी उपविजेतेपद मिळवले. वेटलिफ्टिंग – ७६ किलो वजनगट – प्रतीक्षा कडू (क्रीडा प्रबोधिनी, पुणे).

कुस्तीत मुला-मुलींच्या संघांनी आज सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. हरियाणाने दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावले. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिली. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

———-

नंबर वनसाठी चढाओढ

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांसाठी हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे. कधी महाराष्ट्र तर कधी हरियाणा पुढे जात आहे. काल महाराष्ट्र पहिल्या (२४, २४, १४ एकूण ६६) तर हरियाना दुसऱ्या क्रमांकावर (२३, २०, २९ एकूण ७२) होता. आज कुस्ती आणि अॅथलेटिक्समधील पदकांमुळे ही आकडेवारी बदलली. तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर (३०, २३, ३४ एकूण ८७) तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर (२६, २५, २२ एकूण ७३) विराजमान आहे. (रात्री पावणे आठ वाजताची ही आकडेवारी आहे.)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.