सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी आयुक्तांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि.9: शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये. यासाठी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

सोयाबीन बियाणांची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले चांगले बियाणे वापरावे. प्रति हेक्टरी बियाणांचा दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पदध्तीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. व नंतर त्यांची पेरणी करावी. तसेच बियाण्यांची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करण्याचे आवाहनही करण्यात देण्यात आले आहे.    

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.