ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11 :- ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रकार रवी परांजपे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, रवी परांजपे यांची भारतीय शैलीतील चित्रकार म्हणून स्वतंत्र ओळख होती. चित्रकलेबरोबरच त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात क्षेत्रात संस्मरणीय काम केले. जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.