आठवडा विशेष टीम―
मुंबई,दि.14 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या‘लोकराज्य‘या मासिकाच्या जून-2022महिन्याच्या‘समता,न्याय,एकात्मतेच्या मार्गावर…माझा महाराष्ट्र’या सामाजिक न्याय विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना,उपक्रम,यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
26जून हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यात सामाजिक न्यायदिन म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून या विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल,बहुजनांचा सर्वांगीण विकास,वंचितांसाठी योजना,कल्याणकारी महामंडळे,डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आदी विषयांवरील लेखांचा या अंकात समावेश आहे. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या प्रातिनिधिक यशकथा,राज्याच्या खरीपपूर्व हंगामाचा आढावा व दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या वृत्तांताचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी,वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्याhttps://dgipr.maharashtra.gov.
०००