जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि. 17:  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातीन नियोजन भवनात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील,   जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जल जीवन मिशन अंतर्गतच्या नळा पाणी पुरवठा योजनांची सादरीकरणाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी माहिती दिली.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान  व आदर्श शाळाचाही घेतला आढावा

जल जीवन मिशन बैठकीनंतर   स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानाचाही आढावा घेण्यात आला आला. स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, स्मार्ट मनुष्यबळ, स्मार्ट संदर्भसेवा, स्मार्ट माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यावर आधारित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.

आदर्श शाळा अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 प्रत्येक तालुक्यामध्ये  एक    प्राथमिक आरोग्य केंद्राची  व   शाळेची  निवड करुन या अभियानांतर्गत  स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व  आदर्श शाळा उभ्या कराव्यात. जेणे करुन हे अभियान पूर्ण जिल्हाभर राबविण्यास मार्गदर्शक ठरेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत सांगितले

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.