• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २२ जून २०२२

June 23, 2022

सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

June 30, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

June 30, 2022

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

June 30, 2022

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

June 30, 2022

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

June 30, 2022

मंत्रिमंडळ निर्णय

June 30, 2022

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीचे उद्घाटन संपन्न

June 30, 2022

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी ९ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर

June 29, 2022

बीड: डोंमरी येथील युवकाने काही दिवसासाठी 'मुख्यमंत्री' बनवा अशी राज्यपालांकडे केली मागणी

June 28, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

June 26, 2022

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

June 26, 2022

शाहू महाराज : बहुजनांच्या सार्वत्रिक विकासासाठी प्रयत्नरत रयतेचा राजा

June 26, 2022
  • मुख्य पान
  • ब्रेकिंग न्युज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र राज्य
  • राजकारण
  • शेतीविषयक
  • सामाजिक
  • ईपेपर
  • संपर्क
  • Login
आठवडा विशेष
WhatsApp✆
  • मुख्य पान
  • बीड जिल्हा
    • पाटोदा तालुका
    • बीड तालुका
      • बीड शहर
      • लिंबागणेश सर्कल
      • मांजरसुंबा
    • केज तालुका
    • अंबाजोगाई तालुका
    • आष्टी तालुका
    • गेवराई तालुका
    • धारूर तालुका
    • परळी तालुका
    • शिरूर तालुका
    • माजळगाव तालुका
    • वडवणी तालुका
  • कोरोना विषाणू - Covid 19
  • औरंगाबाद जिल्हा
    • सोयगाव तालुका
  • संपर्क
  • मुख्य पान
  • बीड जिल्हा
    • पाटोदा तालुका
    • बीड तालुका
      • बीड शहर
      • लिंबागणेश सर्कल
      • मांजरसुंबा
    • केज तालुका
    • अंबाजोगाई तालुका
    • आष्टी तालुका
    • गेवराई तालुका
    • धारूर तालुका
    • परळी तालुका
    • शिरूर तालुका
    • माजळगाव तालुका
    • वडवणी तालुका
  • कोरोना विषाणू - Covid 19
  • औरंगाबाद जिल्हा
    • सोयगाव तालुका
  • संपर्क
WhatsApp✆
आठवडा विशेष
ADVERTISEMENT

मुख्य पान » Blog » मंत्रिमंडळ निर्णय : दि. २२ जून २०२२

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २२ जून २०२२

Share on WhatsappShare on Facebook

आठवडा विशेष टीम―

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येईल.

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.

—–०—– 

विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन

कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

 

कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राज्यात कोरोना काळात  21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत भादंवि कलम 188 अन्वये, भादंवि कलम 188 सह साथरोग प्रतिबंध / आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह 269 किंवा 270 किंवा 271 सह साथरोग प्रतिबंध/ आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 सह 135 अशा कलमान्वये विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर खटले  दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व इतर ठिकाणी चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करून हे खटले मागे घेण्यासाठी शासनाने राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याकरिता जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या क्षेत्रिय समितीला कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

तथापि, ही कार्यवाही करताना ज्यामध्ये सरकारी नोकर व फ्रंट लाईन वर्कर यांच्यावर हल्ले झालेले नसावेत आणि ज्यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी विचारात घेतल्या जाव्यात अशीही मान्यता देण्यात आली

—–०—— 

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटल्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रिय समिती गठित करण्यास व समितीने त्यावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांशी संबंधित खटले मागे घेण्यासाठी अशा घटनेत जिवीतहानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

ही कार्यवाही करताना सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (दिवाणी क्र.699/2016-अश्विनीकुमार उपाध्याय विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ज्या खटल्यांमध्ये विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा समावेश आहे असे खटले मा. उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेता येणार नाहीत.

—–०——

अर्थ व सांख्यिकीमध्ये अपर संचालक पद

 

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण 996 पदांच्या सुधारित आकृतीबंधात अपर संचालक हे नियमित पद निर्माण करण्यास  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या पदाचे ग्रेड वेतन 6 व्या वेतन आयोगाप्रमाणे 7600 आणि 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे एस-25 : 78800-209200 अशा वेतन संरचनेत असेल. सद्य:स्थितीत सांख्यिकी विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून संचालनालयांच्या कामांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  त्यादृष्टीने या पदाची आवश्यकता आहे.

—–०—–

करमाळा, कळंब येथे न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय

 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे दिवाणी  न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

करमाळा येथे बार्शी दिवाणी न्यायालयात मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत.  करमाळा ते बार्शी हे अंतर 70 कि.मी. असून काही गावांचे अंतर बार्शीपासून 125-130 कि.मी. असून त्यामुळे वकील आणि पक्षकारांसाठी गैरसोय होत आहे.  बार्शी येथे सध्या कार्यरत 3 न्यायालयांकडे एकूण 4186 दिवाणी प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 1189 प्रकरणे नव्याने होणाऱ्या करमाळा दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केल्यास बार्शी दिवाणी न्यायालयात एकूण 2997 इतकी दिवाणी प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत.  या ठिकाणी एकूण 16 नियमित व 3 बाह्य यंत्रणेद्धारे अशा एकूण 19 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.

कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 25 आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्यासाठी 15 अशी पदे देखील निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

इतर वृत्त

राज्यात ५२७ टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात २० जूननुसार ६३४ गावे आणि १३९६ वाड्यांना ५२७ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ८८ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३९ इतकी आहे. मागील आठवड्यात टँकर्सची संख्या ५०१ इतकी होती.  पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे एक-दोन दिवसात टँकर्स कमी होतील अशी आशा आहे.

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २० जूननुसार २२.३२ टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३२.८१ टक्के, मराठवाडा विभागात २६.८ टक्के, कोकण विभागात ३५.१२ टक्के, नागपूर विभागात २७.३९ टक्के, नाशिक विभागात २१.२१ टक्के, पुणे विभागात १३.२८ टक्के  पाणीसाठा उपलब्ध आहे. अधिग्रहित केलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या २२६७ इतकी आहे.

—–०—–

वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडविषयक सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते.  आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्ण संख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे.  यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत.  सध्या २५ हजार सक्रिय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.  रुग्णालयात ४.६४ टक्के रुग्ण आहेत.  मुंबईत सध्या जवळपास ३० टक्के पॉझिटीव्हीटी असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली.  देशामध्ये आज ८१ हजार सक्रिय रुग्ण असून त्यातील २५ हजार एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

—–०—–

SendShare98Share
Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
Play History Quiz & win coins now Play History Quiz & win coins now
ADVERTISEMENT
editor

editor

Related Posts

सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

June 30, 2022
700

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

June 30, 2022
700

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest

Maharashtra Police Bharti 2022: Apply 7231 पोलीस भरती Online Form - mahapolice.gov.in

May 17, 2022 - Updated on June 28, 2022

पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

May 16, 2022

पाटोदा: नागेशवाडीत केमिकल पासून बनावट दूध ; ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

March 26, 2022

Maharashtra Police Bharti 2022: Apply 7231 पोलीस भरती Online Form - mahapolice.gov.in

16

...तर होतील पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ?

2

शेख तौसिफ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही - पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

2

सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

June 30, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

June 30, 2022

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

June 30, 2022
आठवडा विशेष

Copyright © 2022 आठवडा विशेष (मराठी साप्ताहिक)

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • ब्रेकिंग न्युज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र राज्य
  • राजकारण
  • शेतीविषयक
  • सामाजिक
  • ईपेपर
  • संपर्क
  • Login

Copyright © 2022 आठवडा विशेष (मराठी साप्ताहिक)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

-
00:00
00:00

Queue

Update Required Flash plugin
-
00:00
00:00