‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सिद्धार्थ खरात यांची रविवार २६ जूनला मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने राजर्षि शाहू महाराज विचारांचे अभ्यासक सिद्धार्थ खरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.  रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रविवार, दि. 26 जून 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला दिशा देणारे, समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी काळजी करणारे, आधुनिक जगाशी नाळ जोडताना रयतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचे योगदान याविषयी सविस्तर माहिती सिद्धार्थ खरात यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.