Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि, 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विधानसभेचे सदस्य तथा विधानसभा माजी अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सदस्य डॉ. रणजित पाटील, राजेश राठोड, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव श्री.राजेश तारवी, विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
०००