राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 1 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.”स्वराज्य महोत्सव” अंतर्गत राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तर अशा विविधस्तरावर “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे जनसहभागातून आयोजन करण्यात येणार आहे.

“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यक्रम

समूह राष्ट्रगान, आयकॉनिक सांस्कृतिक कार्यक्रम, कॉफीटेबल बुक प्रकाशन, 60 मान्यवरांच्या लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन, गिरगाव चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई. इ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन

हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, रस्ते संग्रहालय, 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभेचे आयोजन, एनसीसी/एनएस एस सायक्लोथॉन/ मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, विविध निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धा आयोजन,  प्रदर्शने, हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

तालुकास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन

वृक्षारोपण मोहीम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, वारसा स्थळ / पुरातत्व दत्तक योजना, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाम लोगो, स्वच्छता मोहीम, संविधान स्तंभ उभारणी

ग्रामस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन

विशेष ग्रामसभा, हर घर तिरंगा, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, अर्थसाक्षरता विषयक शिबीर, शेतकरी मेळावे, पर्यावरण संर्वधन शपथ, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन “स्वराज्य महोत्सवांतर्गत करण्यात आले आहे.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.