आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शरीफ शेख यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दि. 2 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कार्यरत असून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे. या मंडळाचे उद्दीष्ट, कार्य आणि भविष्यातील योजना याविषयी सविस्तर माहिती डॉ. लालमियाँ शरीफ शेख यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
000