‘जल आंदोलन’ हे जन आंदोलन आणि अमृत सरोवर

आठवडा विशेष टीम―

प्रधानमंत्री यांनी 22 मार्च, 2022 रोजी ‘’जलशक्‍ती अभियानः कॅच द रेन (JSA CTR)’’ हे अभियान सूरू केले आहे. या अभियानाचे ब्रिदवाक्‍य  – ‘पाऊस जेव्‍हा आणि जिथे पडेल त्‍यानुसार जलसंचय’ हे असून मुख्‍य लक्ष पावसाच्‍या पाण्‍याचे संधारण करून साठवण करणे असा आहे. तसेच जलशक्‍ती अभियान (JSA-II) कार्यक्रमांतर्गत मोहीम राबविण्यासाठी  जिल्‍ह्यामध्‍ये ‘जल आंदोलन हे जन आंदोलन’ करण्‍याच्‍या उद्देशाने अभियान राबविण्यात येणार आहे.

केंद्र पुरस्‍कृत जलशक्‍ती अभियानांतर्गत कॅच द रेन कार्यक्रमाचा कालावधी माहे 29 मार्च 2022 ते 30 सप्‍टेंबर 2022 असा आहे. या योजनेंतर्गत जलसंधारण आणि पावसाचे पाणी पुनर्भरण, पारंपारिक आणि इतर जलस्त्रोत तसेच मुख्‍य जलसाठ्यांचे नूतनीकरण, जल संरचनेचा पुनर्वापर व पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास करणे, सघन वनीकरण इत्‍यादी कामे घेण्‍यात येणार आहेत. या अभियानाबाबतची माहिती jsactr.mowr.gov.in या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे.

सद्य:स्थितीत जलशक्‍ती अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत तलाव व टाकी 40, रुफ टॉप वॉटर हार्वेस्टिंग स्‍ट्रक्‍चर्स (सार्वजनिक)  400, शोषखड्डे 1500, सघन वनीकरण – वृक्षारोपण 130 कामे, उपवन संरक्षक वन विभाग सातारा यांच्यामार्फत चेक डॅम 32, इतर जलसंधारण संरचना (गॅबियन मातीचे धरण इ.) 76, पारंपारिक व इतर जलकुंभ व टाक्‍यांचे नुतनीकरण 10, गहन वनीकरण- रोपवाटिका 13, सघण वनीकरण- वृक्षारोपण 72, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांचेमार्फत गहन वनीकरण- रोपवाटिका  39, सघन वनीकरण- वृक्षारोपण 72.

प्रकल्‍प संचालक (जल जीवन मिशन) जिल्हा परिषद सातारा यंत्रणेमार्फत शोषखड्डे-918 कामे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा या यंत्रणेमार्फत चेक डॅम 11 कामे, तलाव व टाकी 25 कामे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्‍हा परिषद, सातारा या यंत्रणेमार्फत पुनर्भरण संरचना  936 कामे, जिल्‍हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सातारा या यंत्रणेमार्फत इतर जलसंधारण संरचना (बेंच टेरेसिंग,कालवा/सिमेंट कॉंक्रीट बंधारा/कोल्‍हापूर पध्‍दतीचा बंधारा) 163 कामे, पारंपारिक जलस्‍तोत्र पुनर्संचयित 30 कामे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (बाल कल्‍याण) सातारा जिल्‍हा परीषद, सातारा या योजनेमार्फत 3274 वृक्षलागवडीची कामे, जिल्‍हा जलसंधारण अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग जिल्‍हा परीषद, सातारा या योजनेमार्फत साठवण बंधारा 60, वळण बंधारा 15, इतर जलसंधारण संरचना (साठवण टाकी) 4, पारंपारिक व इतर जलस्‍तोत्र पुनर्संचयित पाझर तलाव- 24, गाव तलाव-6, साठवण बंधारा 19, वळण बंधारा- 7, को.प.बंधारा- 2, साठवण टाकी -1 कामे, यांचा आराखडा सादर करण्यात आला आहे आणि सर्व यंत्रणा अभियानात सहभाग नोंदवून जलशक्‍तीची कामे करत आहेत.

अमृत सरोवर

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमित्‍ताने केंद्र सरकारने विविध योजनांच्‍या माध्‍यमातून व संयोजनातून प्रत्‍येक जिल्‍ह‌्यात एकूण 75 अमृत सरोवर पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट ठरवून दिलेले आहे. या अभियानाचा कालावधी माहे 24 एप्रिल, 2022 ते 15 ऑगस्‍ट, 2022 असा आहे. यामध्‍ये जिल्ह्याकरिता ठरवून दिलेल्या एकूण उद्दिष्टांमध्ये नवीन तलाव/जलाशय तयार करणे, अस्तित्वात असलेल्या तलाव/जलाशयांचे पुनरुजीवन करणे व गाळ काढणे यांचा समावेश असून यांनाच “अमृत सरोवर” असे संबोधण्यात आले आहे.  प्रत्येक अमृत सरोवर हे किमान 1 एकर (0.4 हेक्‍टर) आकारमानाचे व किमान 10 हजार क्‍यूबीक मीटर पाणी साठवण क्षमतेचे असणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत सातारा जिल्‍ह्यामध्‍ये एकूण 108 अमृत सरोवराची कामे निवडली असून फलटण व माण या तालुक्‍यामध्‍ये अधिक प्रमाणात अमृत सरोवरची कामे सुरु आहेत. त्‍यापैकी दि.14 ऑगस्‍ट, 2022 पूर्वी 20 टक्‍के कामे पूर्ण करण्यात येवून दि.15 ऑगस्‍ट, 2022 रोजी प्रत्‍येक अमृत सरोवर स्‍थळी ध्‍वजारोहणासाठी Plat Form तयार करणेत येत असून स्‍थानिक स्‍तरावर ग्रामपंचायत यांचेकडे हस्‍तांतरीत केला जाणार आहे. तसेच दि.15 ऑगस्‍ट, 2022 रोजी स्‍वातंत्र्य दिनाला अमृत सरोवर स्‍थळी स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्‍यांचे परिवारातील सदस्‍य, स्‍वातंत्र्या नंतरच्‍या काळातील शहीद झालेल्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍याव्‍दारे किंवा जे स्‍थानिक पदम अवार्ड प्राप्‍त व्‍यक्‍तींकडून ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

या अभियानाच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक आयोजित करून संबंधित सर्व जिल्‍हास्‍तरीय यंत्रणांना प्रशिक्षण व या योजनेविषयी सर्व मार्गदर्शक सूचना देण्‍यात आल्‍या असून त्‍यानुसार कार्यवाही सुरू आहे.

या आर्थिक वर्षामध्‍ये सर्व जिल्‍हास्‍तरीय यंत्रणांमार्फत जलशक्‍ती अभियान व अमृत सरोवर या अभियानांतर्गत कामे घेण्‍यात आली असून त्‍याप्रमाणे जिल्‍हा नोडल अधिकारी तथा जिल्‍हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग सातारा यांचे कार्यालयास जिल्‍हा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

तसेच जलशक्‍ती व अमृत सरोवर या अभियानांच्‍या धर्तीवर केंद्र शासनाकडील नोडल अधिकारी श्री.पांडे यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे जिल्‍ह‌्याचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी शेखर सिंह व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व शासकीय यंत्रणा तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशासकीय संस्‍था यांचे जिल्‍हानिहाय आराखडे तयार करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या.  त्‍याअनुषंगाने या अभियानाची जाणीव जागृती व प्रचार प्रसिध्‍दी अधिकाधिक प्रमाणात करण्‍यासाठी नियोजन करावे, असे आवाहन उपजिल्‍हाधिकारी (रोहयो), श्रीमती विजया यादव यांनी केले आहे.

00000

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.