आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 6 जुलै व गुरूवार 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. या काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर माहिती डॉ.पल्लवी सापळे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००
प्रवीण कुलकर्णी/उपसंपादक/