आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवाजी पार्क येथील राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.
००००