जिल्हयाची माहिती ‘चॅट बॉट’ वर पालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

रत्नागिरी दि.  07 :  आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्हयातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉटसअप चॅटबॉट प्रणालीचे उद्घाटन आज प्रधान सचिव उद्योग तथा पालकसचिव रत्नागिरी विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी एका बैठकीत अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापन याचा आढावा घेतला. यावेळी या प्रणालीचे त्यांनी उद्घाटन केले.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड,पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

दूरध्वनी क्रमांक न लागणे अथवा व्यस्त असणे यामुळे माहिती प्राप्त होणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत हा चॅटबॉट आपणस विविध प्रकारची माहिती आपल्या मोबाईल देणार आहे. या प्रणालीच्या मदतीने प्रत्येक नागरिकास केवळ पर्जन्यमान नव्हे तर नदी पाणी पातळी, वेधशाळेतर्फे जारी सूचना, जिल्हयाबाबत जारी विशेष सूचना, आपतकालीन स्थितीत संपर्क करावयाचे क्रमांक, रस्ते व वाहतूक,  भरतीच्या वेळा, रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा तसेच वेळोवळी जारी महत्वाचे संदेश आपणास तात्काळ प्राप्त करता येतील.

मोबाईल क्रमांक ७३८७४९२१५६ हा क्रमांक असून यावर व्हॉटसॲपच्या माध्यमातून मेसेजचे पर्याय पाठविल्यास R१ ते R९ पर्यंत विविध माहितीची उपलब्धता असणार आहे. या स्वरुपाचा राज्यात हा पहिलाच उपक्रम आहे. यात अधिक सचूकता आणि वेळोवेळी त्यात माहिती अपडेट करण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. या प्रणालीबाबत प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले व योग्य आणि विश्वासार्ह संदेश देण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीत त्यांना कोविड आणि गणपतीपुळे विकास आराखडा यांचाही आढावा घेतला. गणपतीपुळे विकास आराखड‌्यातील कामे 31 डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्‍ट ठेवून नियोजन करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेले पर्यटन रत्न हे कॉफी टेबल बूक जिल्हाधिकारी   डॉ. बी.एन.पाटील यांनी पालक सचिवांना दिले. पुस्तक माहिती पूर्ण असल्याची प्रतिक्रिया पालक सचिवांनी यावेळी दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी संदेश प्रणालीचा 73874 92156 मोबाईल क्रमांक आहे. सदर व्हाट्सअप्प नंबर  वर  Hi असा मेसेज पाठविल्यास आपल्या व्हाट्सअप वर  खालील प्रमाणे संदेश  येईल.  त्यानुसार  पर्यायानुसार  संदेश केल्यास जिल्ह्यातील अनुषंगिक माहिती  आपणास व्हाट्सअप्प मेसेज द्वारे मिळेल रत्नागिरी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे.

खाली नमूद पर्यायांपूर्वी दिलेल्या क्रमांक रिप्लाय ऑप्शन्मध्ये पाठवून जिल्ह्यातील सद्यस्थिती बाबत आपण माहीती घेऊ शकता उदा. आपल्याला पर्जन्यमानाबाबत माहिती हवी असेल तर R1 असा रिप्लाय करा.

R1.पर्जन्यमान

R2.नदी पाणी पातळी अहवाल

R3.वेधशाळा सुचना

R4.विषेश सुचना

R5.आपत्कालीन संपर्क क्रमांक

R6.रस्ते व वहातूक

R7.महत्वाचे संदेश

R8.भरतीच्या वेळा

R9.रत्नागिरी जिल्हा नकाशा

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.