वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा. इंद्र मणी यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे २०२२ रोजी संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य व कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रा. जगमोहन सिंह राजपूत, निवृत्त महासंचालक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह  व राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे या समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. इंद्र मणी यांच्या निवडीची घोषणा केली.

**

Dr Indra Mani is new Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth

 

The Governor of Maharashtra and Chancellor of public universities in the State Bhagat Singh Koshyari today appointed Dr Indra Mani as the new Vice Chancellor of the Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.

Dr Indra Mani has been serving as the Joint Director Research at the Indian Agricultural Research Institute, New Delhi (ICAR). He has been appointed as Vice Chancellor for a term of 5 years from the date he assumes the charge of the office of vice chancellor.

He succeeds Dr Ashok Dhawan whose term as vice chancellor ended on 6th May 2022. Dr Pramod Yeole, vice chancellor of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad was holding the additional charge of the post.

Dr Indra Mani obtained his M.Sc. and Ph.D. in Agricultural Engineering from the Indian Agricultural Research Institute. He has vast experience of teaching, research, administration and extension service.

The Governor had constituted a selection committee under the chairmanship of  Prof. Jagmohan Singh Rajput, Former Director, NCERT, New Delhi to recommend to him a panel of names suitable for appointment of the Vice Chancellor.

Dr. A. K. Singh, Director, Indian Agricultural Research Institute (IARI) and Eknath Dawale, Secretary to Government (Agriculture), Agriculture & ADF Department were members of the Committee.

The Governor announced the name of Dr Indra Mani after interviewing all candidates recommended by the panel.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.