२२ व्या भारत रंग महोत्सवात ‘आज़ादी श्रृंखला’ अंतर्गत मुंबईत ५ नाटके, २ नाटके मराठीत

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली : राष्ट्रीय नाट्य शाळेच्या वतीने, आज़ादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर 16 जुलैपासून 22 वा भारत रंग महोत्सव सुरू होणार आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईत एक-एक मराठी नाटक सादर करण्यात येईल. 22 व्या भारत रंग महोत्सवातंर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर एकूण 30 नाटके 8 भाषेत 6 विविध राज्यांतील शहरात सादर होणार असल्याची माहिती संचालक डॉ.रमेश चंद्र गौर यांनी राष्ट्रीय नाट्य शाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये दिल्ली येथे 16 ते 20 जुलै 2022 पर्यंत एकूण 5 नाटके सादर केली जातील. मराठी भाषेतील ‘द प्लान’ हे नाटक 20 जुलै रोजी दिल्लीतील कमानी सभागृहात सायंकाळी 7 वाजता सादर केले जाईल.

9 ते 13 ऑगस्टपर्यंत मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी या सभागृहामध्ये एकूण 5 नाटके सादर केली जातील. यामधील 12 ऑगस्ट रोजी सादर होणारे  ‘टिळक आणि आगरकर’ हे  नाटक हे मराठीत असणार आहे. 9 ऑगस्टला ‘आय एम सुभाष’, 10 ऑगस्टला ‘गांधी आंबेडकर’, 11 ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती’ 13 ऑगस्टला ‘रंग दे बंसती चोला’ ही चार नाटके हिंदीत असणार आहेत.

14 ऑगस्टला आज़ादी श्रृंखलेचा समारोपीय कार्यक्रम नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे होणार आहे.

याशिवाय 21 ते 25 जुलै दरम्यान भुवनेश्वर(ओडीसा), 26 ते 30 जुलै दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश), 31 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत अमृतसर (पंजाब), 5 ते 8 ऑगस्ट या दरम्यान बंगळूर (कर्नाटका) येथे नाटक सादर होणार आहेत. या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायकांचा परिचय करून देण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. गौर यांनी यावेळी सांगितले.

0000000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.104/दि.14.07.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.