इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदतवाढ

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी  विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून दिनांक २३ मे २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २३ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.