Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.२० : राज्याच्या महसूल व वन विभागातंर्गत आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज रुजू झाले.
श्री. धुळाज यांनी यापूर्वी राज्य कामगार विमा योजना आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी कोल्हापूर आणि लातूर येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभागाचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.