एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 22 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त, संजय लाटकर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.