आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 25 : जागतिक कांदळवन संरक्षण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कांदळवन कक्षाच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 26 जुलै व बुधवार 27 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ मुलाखतकार संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कांदळवने ही समुद्र किनारे आणि खाड्यांचे केवळ संरक्षक नाहीत तर ते जैवविविधतेचे खूप मोठे रक्षणकर्ते आहेत. कांदळवन परिसंस्थांचे जतन व्हावे यासाठी 26 जुलै हा जागतिक कांदळवन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. कांदळवनाचे महत्त्व, त्यामाध्यमातून नव्या उपजिविकांची निर्मिती आणि जैवविविधतेतील त्यांचे स्थान याबाबत सविस्तर माहिती अनिता पाटील यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००
प्रवीण कुलकर्णी/उपसंपादक/25.7.22