पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 : राजभवन येथे कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दिवंगत भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेले भुजबळ यांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला मुकलो आहोत, या शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

श्री. भुजबळ यांना आज दुपारी राजभवन परिसरातील त्यांच्या कार्यालयात असतानाच छातीत दुखू लागल्याने इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.