इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरिता ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २८: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत आता दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.