अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपालांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 9 : अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत माईक हँकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी माईक हँकी यांनी अमेरिका – भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत राज्यपालांना माहिती दिली. गेल्यावर्षी भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी 62000 विद्यार्थी गेले होते.  हे सर्व विद्यार्थी अमेरिकेचे सदिच्छा राजदूत आहेत, असे सांगून भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील वर्षी  आणखी एक लाखांनी वाढविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे वाणिज्यदूतांनी यावेळी सांगितले.

बैठकीला राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन तसेच अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक उपस्थित होते.

*****

New US Consul General meets Governor Koshyari

Mumbai Dated 9 : The newly appointed Consul General of the United States of America in Mumbai Mike Hankey met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.

The Consul General discussed his plans and priorities to promote bilateral cooperation with India. He told the Governor that more than 62000 student visas were issued from India last year. Stating that Indian students going to US for studies are goodwill ambassadors of the United States, he said his country is keen to achieve the target of 1 lakh students next year.

Christopher Brown, Consul for Political and Economic Affairs and Priyanka Visaria – Nayak, Political Advisor to the U. S. Consulate General were also present.

*****

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.