प्रशासकीय

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 13 : आजादी का अमृत महोत्सव निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, महामेट्रो नागपूर व रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी येथील मेट्रो जंक्शन येथे आयोजित केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे, घरोघरी तिरंगा, बुस्टर लसिकरण भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी महामेट्रो नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरणचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणेचे उपसंचालक निखील देशमुख, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन राय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक संचालक हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी श्री. गडकरी यांनी फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले. तसेच प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात सन 1700 पासून ते 1947 पर्यन्तचा भारतीय स्वाशतंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व महापुरूषांची माहिती, स्वापतंत्र्य नंतरचा भारत एकसंघ करण्यासाठी केलेले प्रयत्न, भारताचा संविधान, स्वतंत्रता आंदोलनातील प्रमुख स्थाळ, भारत सरकारने केलेल्या विकास कामांबाबत मा. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीजी यांचा संदेश अशी विविध प्रकारची माहिती सांगणारे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणारे भव्य छायाचित्रांचा समावेश आहे. त्याच बरोबर रस्ते वाहतुक व महामार्ग प्राधिकरणाने नागपूर व परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती असलेले छायाचित्र, महामेट्रो द्वारे नागपूरात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती असलेले छायाचित्र, भारताच्या फाळणीचा इतिहास उलगडणारे विविध माहिती सांगणारे छायाचित्र लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन 16 ऑगस्ट पर्यंत चालणार असून नागरीकांसाठी निःशुल्क आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सदर छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमात महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, रस्ते वाहतुक महामार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख, सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या नेतृत्वात तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकाय, संतोष यादव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार

यांनी केली प्रदर्शनाची पाहणी

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी छायाचित्र प्रदर्शन स्थळाला भेट देऊन पाहणी केली. नागरीकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन भावी पिढीच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्र सरकारच्या विकास कामांची

माहिती सांगणारे मल्टिमिडीया प्रदर्शन

भारत सरकारने केलेल्या ८ वर्षाच्या विकास कामांची माहिती सांगणारे मल्टिमिडीया प्रदर्शनाचाही यात समावेश आहे. केवळ बोटाच्या एका क्लिकद्वारे मागील आठ वर्षात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती नागरीकांना मिळत आहे.

३० नागरीकांनी घेतला बुस्टर लसिकरणाचा लाभ

केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिताबर्डी येथील आजादी का अमृत महोत्सव छायाचित्र प्रदर्शनाच्या ठिकाणी बुस्टर लसिकरण शिबीर लावण्यात आले आहे. या शिबिरात आज ३० नागरीकांनी बुस्टर लसिकरणाचा लाभ घेतला.

देशभक्ती गीताने नागरीक मंत्रमुग्ध

केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे येथील गीत व नाटक विभागाने विविध देशभक्ती गीत सादर करून उपस्थित नागरीकांना मंत्रमुग्ध केले.  गीत व नाटक विभागाचे व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील यांच्या नेतृत्वात गायक मकरंद मसराम, उपाधि सिंग, कुमुद ककोनिया, डॉ. ममता मसराम, मंदार गुप्ते, गौतमी गोसावी, प्रकाश वाकडे यांच्यासह इतर चमूने हे गीत सादर केले.

तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी

जिल्हा परिषदेने तयार केलेले माहिती पत्रकाचे वितरण

केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १६ ऑगस्ट २०२२ दरम्यान हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे छायाचित्र प्रदर्शनाला भेट देणा-या नागरीकांना वितरण करण्यात आले. या माहिती पत्रकात नागरीकांना तिरंगा ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या माहितीचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button